Video-गर्लफ्रेंड सोबत फिरणाऱ्या नवऱ्याला पत्नीने भर रस्त्यात चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

गर्लफ्रेंड सोबत फिरत असलेल्या एका नवऱ्याला पत्नीने चांगलाच चोप दिला आहे. नागपूरातील सीए रोडवर पतीचा सिनेस्टाईलने पाठलाग करून तिने गर्लफ्रेंड सोबत दोघांना रंगेहाथ पकडले. यामुळे हादरलेल्या नवऱ्याची भीतीने गाळण उडाली. यावेळी संतापलेल्या पत्नीने शिव्यांची लाखोळी वाहत त्याची भर रस्त्यात धुलाई केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे. या प्रकरणी पती आणि पत्नीची एकमेकाविरोधात तहसील पोलिस स्टेशनमघ्ये तक्रार दाखल केलाी आहे.