
सामना प्रतिनिधी । पुणे
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी नामदेव शिरगावकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नामदेव शिरगावकर सध्या हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच गोव्यातील पणजी येथे 30 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रल्हाद सावंत यांच्या आकस्मिक निधनानंतर उपाध्यक्ष पद रिकामे झाले होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या बैठकीत नामदेव शिरगावकर यांच्या नावावर या पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.

























































