प्रकाश गायकवाड, साधना भातखंडे, बलराज साळोखे यांना सेवाभावी पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुग्णसेवा दिनाचे औचित्य साधून परळ येथील नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणाऱया सेवाभावी पुरस्कार 2024 चे वितरण शनिवार, 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाचे प्रमुख आणि मुख्य समाज विकास अधिकारी डॉ. प्रकाश गायकवाड, केईएम रुग्णालयाच्या मुख्य समाज विकास अधिकारी डॉ. साधना भातखंडे आणि मुंबई पोलीस दलाच्या दहशतवादविरोधी पथक नागपाडा युनिटचे बलराज साळोखे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

पुरस्कार सोहळय़ाचे मुख्य अतिथी लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी तर विशेष अतिथी म्हणून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे उपस्थित राहणार आहेत. नाना पालकर स्मृती समिती, सातवा मजला, रुग्णसेवा सदन, नरे पार्क, परळ येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे, सचिव सुमेधा जोशी यांनी दिली. नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने रुग्णसेवा दिनाचे औचित्य साधून सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा करणाऱया मान्यवरांचा दरवर्षी सेवाभावी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.