
सामना ऑनलाईन, नालगोंडा
तेलुगू चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आणि तेलुगू देसम पक्षाचे आमदार नंदमुरी हरीकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

नंदमुरी हे ज्युनिअर एनटीआर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नावाजलेल्या तेलुगू अभिनेत्याचे वडील आहेत. नेल्लोरवरून हैद्राबादला परत येत असताना हा अपघात झाला.
#SpotVisuals: Actor and TDP leader Nandamuri Harikrishna dies in a car accident in Telangana’s Nalgonda district. pic.twitter.com/4EusxbqXmw
— ANI (@ANI) August 29, 2018
नंदमुरी हरिकृष्ण हे आपल्या टोयोटा फॉर्च्युनरने नेल्लोर येथे गेले होते. तिथून परत येत असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची गाडी डिव्हायडरवर आदळून उलटली. जेव्हा अपघात झाला तेव्हा त्यांच्या गाडीचा वेग १५० किलोमीटर प्रतितास इतका होता असं सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भयंकर होता की डिव्हायडरवर कार आदळल्यानंतर नंदमुरी हे कारची समोरची काच फोडून बाहेर फेकले गेले. नंदमुरी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत प्रवास करणारे इतर तिघेजण जबर जखमी झाले आहेत.
























































