यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीचा भीषण अपघात; सात जण ठार

नंदुरबार येथून अस्तंबा ऋषींच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखरावर अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेवरून परतत असताना चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली. हा अपघात इतका भयंकर होता की, सात भाविकांचा मृत्यू झाला.