‘स्वाभिमान’ जागा झाला; नारायण राणे लोकसभा स्वबळावर लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कणकवली

भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले नारायण राणे यांच्या पक्षाचा ‘स्वाभिमान’ जागा झाला असून आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. लोकसभेच्या किती जागा लढवणार याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही.

राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. खासदारकी स्वीकारताना मी फक्त भाजपसोबत आहे, एनडीएमध्ये नाही असे म्हटले होते हे राणे यांनी आवर्जून सांगितले. राष्ट्रवादीसोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसून लोकसभेत स्वतंत्र चूल मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणूनच भाजपला पाच राज्यांत फटका बसला. महाराष्ट्रातही तेच होणार आहे, असेही राणे म्हणाले.