
मलेशिया येथून ड्रग तस्करीचे रॅकेट चालवणाऱयाला पकडण्यात अखेर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) एनसीबीला यश आले. नवीन चिचकर असे त्याचे नाव आहे.
मुंबईहून ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात येणाऱया प्रोजेक्टर असलेल्या त्या पार्सलची तपासणी केली. त्यात 200 ग्रॅम कोकेन मिळून आले. याचा तपास एनसीबीने सुरू केला. चौकशीदरम्यान एनसीबीने नवी मुंबई येथे एका ठिकाणी छापा टाकला. छापा टाकून 11.540 ग्रॅम कोकेन, 4.9 किलो गांजा आणि 5.5 किलो गांजा जप्त केला. ते आंतरराष्ट्रीय सिंडिकेट अमेरिकेतून हिंदुस्थानात कोकेनची तस्करी करण्यात ते गुंतले होते. क्लिअरिंग हाऊस एजंट आणि हवाला ऑपरेटरचा सहभाग आढळून आला.
एनसीबीने आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. एलएसडीएसह ड्रगशी संबंधित पूर्वीच्या प्रकरणात फरार झाल्यानंतर 2021 मध्ये थायलंडमध्ये सापडलेला तो प्रमुख सूत्रधार होता. चिचकरविरोधात एनसीबीने रेड काॅर्नर नोटीस जारी केली होती. त्याला हिंदुस्थानात परत आणण्यात आले आहे.
चिचकर हा मलेशिया येथून वर्षभरापासून सिंडिकेट चालवत होता. तो हवाई आणि मालवाहतुकीद्वारे कोकेनची तस्करी करत होता. तपासात चिचकरची मालमत्ता आणि बँक खात्याची ओळख पटली आहे. ती मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱयाने सांगितले.