जोर का झटका धीरेसे: महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटलांनी दिल्या शिवेंद्रराजेंना शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सातारा

महायुतीचे उमेदवार व माथाडी कामगरांचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत साताऱ्यात आपला उमेदवारी अर्ज भरला. या जबरदस्त शक्तिप्रदर्शनामुळे राष्ट्रवादीच्या उरात धडकी भरली. मात्र त्याचवेळी नरेंद्र पाटीलांनी अजून एक ‘जोरका झटका धीरेसे’ देत थेट जावलीतील मेढा येथे जाऊन राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी “एकच राजे, बाबाराजे” अशी घोषणा दिल्याने उदयनराजे समर्थक हडबडले आहेत.

नरेंद्र पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याची उमेदवारी शिवसेनेतून मिळवून रणांगणातील अर्धी लढाई मारलेली असतानाच आता नरेंद्र पाटील व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीने राजकीय समिकरणे बदलली आहेत. यातूनच त्यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांना लक्ष केले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा परीषद उपाध्यक्ष वसंतराव मानकपमरे यांच्याबरोबर नरेंद्र पाटलांचे चांगली गट्टी आहे. अनेक नाराज छुपे गट नरेंद्र पाटलांच्या पाठीमागे असल्याने त्यांचे पारडे हळुहळु जड होत चालले आहे.