संचारबंदीमुळे नाशिकमध्ये शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक शहर व जिल्हावासीयांनी सर्व निर्बंधांचे काटेकोर पालन करीत राज्य शासनाच्या आवाहनाला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते व बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा तेवढय़ा सुरळीत होत्या.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद देत जागरूक नागरिकाची भूमिका पार पाडली. राज्यात बुधवारी रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी देखील नाशिक शहर व जिह्यात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाजारपेठांमधील इतर सर्वच दुकाने बंद होती. नेहमी गजबजलेल्या मुख्य रस्त्यांवर तुरळक वर्दळ होती.

रत्नागिरीत लॉकडाऊनचे पालन

राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे आज रत्नागिरीकरांनी तंतोतंत पालन करायला सुरुवात केली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, खासगी कार्यालये बंद होती. अनावश्यक फिरणाऱया नागरिकांची ऍण्टीजेन चाचणी करण्यात येत होती. सकाळपासून रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती. प्रत्येक नाक्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच फिरण्यास परवानगी असल्याने पोलीस रस्त्यावरून फिरणाऱयांची चौकशी करत होते.