
हिंदुस्थानी गणिती डॉ. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन (22 डिसेंबर) राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मराठी विज्ञान परिषदेने या वर्षी 22 डिसेंबरला सकाळी 11 ते दुपारी 1.30 पर्यंत इयत्ता आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कलात्मक गणिती आकृत्या ही चित्रकला स्पर्धा आणि शिक्षकांकरिता व्याख्यान इत्यादी कार्यक्रमांचे विनामूल्य आयोजन केले आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता https://mavipa.org/events/nmd2022/ या संकेतस्थळावर किंवा मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई-400022 दूरध्वनी-(022)24054714/24057268 वर संपर्क साधावा.



























































