
सरकारबद्दल कुणाला काही म्हणायचं आहे ते म्हणू दे मला महाराष्ट्राची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल यात शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी विधीमंडळ वार्ताहर संघात माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवव ठाकरे चांगलं आणि सर्वांना सोबत घेवून काम करत आहेत अशी स्तुतीही शरद पवार यांनी यावेळी केली.
सरकार पाडण्याबाबत उलटसुलट चर्चा व प्रयत्न होतो आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर बोलताना शिमगा नुकताच संपला आहे. त्यामुळे अजुन कुठला मुहूर्त विरोधकांना शिल्लक राहिलेला नाही, असं मला वाटतं, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, इथली ‘पॉवर’ वेगळी – संजय राऊत
शरद पवार यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी विधानभवन येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री दत्ता बारणे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार शशिकांत शिंदे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार प्रकाश सोळंके, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे नेते, सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी विधानभवन येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. @NCPspeaks @PawarSpeaks pic.twitter.com/Cnl3NqgZoI
— Saamana (@Saamanaonline) March 11, 2020
























































