
कोरोना महामारीमुळे सात महिने बंद राहिलेली राज्यातील धार्मिक स्थळे गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली झाली अन् भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत मंदिर व्यवस्थापनाने प्रत्यक्ष दर्शनाची व्यवस्था केली. त्यांच्या नियोजनाला भक्तांनी चांगल्या सहकार्याची साथ देत देवाचे तेजस्वी रूप आपल्या नजरेत साठवले. गुरुवारी पहिल्या दिवशी सर्वच मंदिरांच्या आवारात दर्शनरांगेची शिस्त, नियम पाळण्याचे व्रत अशा वातावरणात भक्तीचा मळा फुलला होता.
कोरोनाचे संकट अजून पूर्णतः संपलेले नाही. मात्र या संकटातही ईश्वरभक्तीची परंपरा कायम ठेवण्याच्या हेतूने राज्य सरकारने खबरदारी बाळगूनच सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागांतील सर्व मंदिरे खुली झाली. सरकारच्या निर्देशानुसार एकूण क्षमतेच्या 50 टक्के भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. मुंबईतील सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराप्रमाणे बहुतांश धार्मिक स्थळांनी ऑनलाईन बुकिंग व्यवस्था केली होती. त्यामुळे भक्त शिस्तबद्ध रांगेत उभे होते. देवाचा जयघोष करतानाच भक्तांनी तोंडावरील मास्क खाली उतरवू न देण्याची पुरेपूर खबरदारी घेतली होती.
गाभाऱयात फुलांची सजावट; आकर्षक विद्युत रोषणाई
z सात महिन्यांनंतर मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे गुरुवारी सर्वच मंदिरांमध्ये भक्तीचा अभूतपूर्व उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यातील प्रमुख मंदिरांच्या व्यवस्थापनाने प्रवेशद्वारापासून ते मंदिराच्या कळसापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई केलेली दिसली. तसेच गाभाऱयापर्यंत फुलांची आकर्षक सजावट करून वातावरण आणखी प्रफुल्लित करण्यात आले. गाभाऱयात फुलांची सजावट; आकर्षक विद्युत रोषणाई
z सात महिन्यांनंतर मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे गुरुवारी सर्वच मंदिरांमध्ये भक्तीचा अभूतपूर्व उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यातील प्रमुख मंदिरांच्या व्यवस्थापनाने प्रवेशद्वारापासून ते मंदिराच्या कळसापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई केलेली दिसली. तसेच गाभाऱयापर्यंत फुलांची आकर्षक सजावट करून वातावरण आणखी प्रफुल्लित करण्यात आले.




























































