नृत्याचा अद्भुत कलाविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिऑलिटी शोच्या ‘नवरात्र स्पेशल’भागात बाबा रामदेव उपस्थित राहणार आहेत. संगीत आणि जल्लोषाने भारलेल्या या वातावरणात एकापेक्षा एक दमदार नृत्याचे सादरीकरण होईल. अबुझमाड मल्लखांब ग्रुप ‘ओंकारा’ या गीतावर परफॉर्म करून सर्वांना थक्क करेल. त्यांच्या श्वास रोखून धरायला भाग पडणाऱया आविष्कारानंतर बाबा रामदेव यांनी मंचावर जाऊन ग्रुपसोबत मल्लखांबाचे काही उत्कृष्ट नमुने सादर करतील. शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि बादशाह हे परीक्षकदेखील त्यांच्यासोबत मंचावर जाऊन विविध योगासने सादर करतील. हा विशेष भाग रविवारी पाहता येईल.