
क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईचा पर्दाफाश करणारा प्रभाकर साईल आज एनसीबीच्या विशेष पथकासमोर चौकशीसाठी हजर झाला. संध्याकाळी उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमने याआधी प्रभाकर साईलची कसून चौकशी केली. त्यानंतर आज एनसीबीच्या विशेष तपास पथकाने प्रभाकरला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार प्रभाकर आज दुपारी एनसीबीच्या विशेष पथकासमोर हजर झाला. दरम्यान, चौकशीला जाण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभाकर म्हणाला की, मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला जी माहिती दिली. तीच माहिती एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमला दिली. मला फ्रँकी घेतानाच्या स्पॉटवरील आणि लोअर परळ येथील सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले. त्या फुटेजमध्ये दिसणाऱयांची माहिती दिली. तसेच अधिकाऱयांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्याचे तो म्हणाला. तर गुरुवारी उशिरापर्यंत एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडून प्रभाकरची चौकशी करण्यात आली.
वानखेडे यांनी जबाब नोंदवला
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या तक्रारप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणात तपास पथकाने समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.



























































