जगताप, देशमुख, आडसकर ही जत्रेतील दुकाने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्याची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बीड

निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसा बीड जिल्ह्यातील माजलगावात राजकीय टीकेचा धुरळा उठायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजीमंत्री प्रकाश सोळुंके यांनीही टीका करायला सुरुवात कर या धुरळ्यात उडी मारली आहे. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या तीन उमेदवारांवर टीका करताना हे नेते म्हणजे जत्रेतील दुकाने आहेत अशी टीका केली आहे.

ज्या नेत्यांवर सोळुंके यांनी टीका केली आहे त्यांची नावे मोहन जगताप, विद्यमान आमदार आर टी देशमुख, रमेश आडसकर अशी आहेत. या नेत्यांची दुकाने फक्त निवडणुकीच्या काळातच उघडली जातात, निवडणूक संपली की यांची दुकानदारी बंद होते असं सोळुंके यांनी म्हटले आहे. भाजपा या तिघांनाही उमेदवारी देणार नाही भाजपाचा उमेदवार कोणी चौथाच असेल असा दावाही सोळुंके यांनी केला आहे. मोहन जगताप आणि रमेश आडसकर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. हे दोघेही जण टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये दाखल झाले आहेत , हे दोघेही जण विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.