…म्हणून पवारांनी निवडणुकीतून घेतली माघार, चंद्राकांत पाटील यांचं मोठं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad pawar chandrakant patil

सामना प्रतिनिधी । मुंबई

2019 ला वेळ आणि पैसा लावण्यापेक्षा तो 2024 साठी वाचवून ठेवावा अशाच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा, असं मोठं विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं.

नगरमधून राजकीय भूकंपांना सुरुवात झाली पुढील काही दिवसांत असून महाराष्ट्रात अनेक राजकीय भूकंप होणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.’नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-कश्मीरमधील नेत्यांना 2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा, असं विधान केलं होतं. त्याचाच पुनर्रुच्चार त्यांनी यावेळी केला. शरद पवारांनी घेतलेली माघार यातूनच आहे का असं पत्रकाराने विचारल्यावर त्यांनी यामुळे शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा, असं विधान केलं.