
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे फेसबुक अकाउंट पुन्हा एकदा हॅक झाले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. या पेजवर चुकीचा मजकूर दिसून येत असून कृपया याकडे दुर्लक्ष करावे. रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोला सिया राजपूत हे नाव दाखवत आहे. सिया राजपूत कपडय़ाच्या ब्रँडची जाहिरात पवारांच्या पेजवरून करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं.
याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.#facebookhack— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 22, 2023



























































