झोपण्यापूर्वी ‘हे’ 4 पदार्थ कधीही खाऊ नका, शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निरोगी व्यक्तिंचा शांत झोपेशी फार जवळचा संबंध असतो, कारण अपुऱ्या झोपेमुळे गंभीर आजार होऊ शकतात. दिवसभराच्या आहारात असे काही पदार्थ असतात जे झोपण्याआधी खाल्ल्यामुळे झोपेवर परिणाम होऊन झोप उडू शकते. त्यामुळे हे पदार्थ झोपण्यापूर्वी कधीही खाऊ नका. पाहूया झोपण्याआधी कोणते पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

कॅफिन
झोपण्यामध्ये व्यत्यय आणणारा कॅफिन हा घटक आहे. चहा, कॉफी आणि विविध फिजी पेयांमध्ये कॅफिन आढळते. झोपण्यापूर्वी चहा, कॉफी असे कॅफिनयुक्त घटक असलेले पेय प्यायल्याने झोप उडू शकते. म्हणूनच बऱ्याचदा झोप उडवण्यासाठी चहा, कॉफी अशा पेयांचे सेवन केले जाते. त्यामुळे ज्यांना शांत आणि पुरेशी झोप घ्यायची आहे त्यांनी झोपण्यापूर्वी चहा, कॉफीचे सेवन करू नये.

टोमॅटो
झोपण्यापूर्वी टोमॅटो खाणे हेदेखील तुमची झोप उडवण्याचे कारण ठरू शकते, कारण टोमॅटोमुळे ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो शिवाय आणि पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. झोपण्याआधी टोमॅटो खाल्ल्याने अस्वस्थता वाढू शकते यामुळे पुरेशी आणि शांत झोप मिळण्याची शक्यता फारच कमी होते.

कांदा
कांद्यामुळे पचनसंस्थेला त्रास होतो. कांदा पोटात गॅस बनवण्याचे काम करते. या वायूचा तुमच्या पोटाच्या दाबावर परिणाम होतो, कच्चे आणि शिजवलेल्या कांद्यामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. कांदा खाल्ल्यानंतर सरळ झोपल्यानंतर अॅसिड घशाच्या दिशेने ढेकरच्या रुपात बाहेर पडते.

चॉकलेट
कांदे किंवा टोमॅटो या पदार्थांसह अल्कोहोल आणि कॅफिन असलेल्या पदार्थांचा रात्री झोपण्यापूर्वीच्या आहारात समावेश करू नये. झोपण्याआधी चॉकलेट खाणे आणि वेदना निवारक गोळ्या घेतल्यानेदेखील झोपेवर परिणाम होऊ शकतो.