कुलरचा शॉक लागून नवविवाहितेचा मृत्यू, 10 दिवसांपूर्वी झाले होते लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । गेवराई

घरातील साफसफाई करतेवेळी कुलरला हात लागून वीजेचा शॉक लागल्याने एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली.

कोमल संजय शेलार (वय 19, रा.मादळमोही) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. कोमलचा 24 मे रोजी जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी या गावी मादळमोही येथील संजय शेलारशी विवाह झाला होता. गुरुवारी त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. बुधवारी सकाळी उठल्यावर कोमल घरातील साफसफाई, सारवण करत होती. याचवेळी कुलरची देखील ओल्या कापडाने सफाई करत असताना विद्युत प्रवाह उतरला असल्याने शॉक लागला. यामध्ये तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.ही बाब कुटूंबातील सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.