
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील विभागप्रमुखांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
विभागप्रमुख याप्रमाणे –
उदेश पाटेकर – विभाग क्रमांक 1 (बोरिवली, दहिसर, मागाठाणे विधानसभा), अजित भंडारी – विभाग क्र. 2 (कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम विधानसभा), प्रमोद शिंदे – विभाग क्र. 9 (अणुशक्तीनगर, चेंबूर, शीव-कोळीवाडा).
विभाग क्र. 7 च्या महिला विभाग संघटकपदी राजराजेश्वरी रेडकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 7 च्या महिला विभाग संघटकपदी राजराजेश्वरी रेडकर (विधानसभा – मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.