
एमडी ड्रग तस्करीप्रकरणी दोघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. मुस्कान खान आणि वझूल कमर अब्दुल चौधरी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त केले. अनिल करांडे हे साकीनाका पोलीस ठाण्यात ड्युटीला आहेत. गेल्या आठवड्यात ते ड्युटीला होते. पोलिसांचे पथक हे अंधेरी-घाटकोपर लिंक रोड येथे गस्त करत होते तेव्हा एक महिला संशयास्पद फिरत असताना पोलिसांनी पाठलाग करून मुस्कानला ताब्यात घेतले.
घर ‘साफ’ करणारी मोलकरीण गजाआड
सधन घर शोधून घरकाम मिळवायचे. मग चांगलं काम करत असल्याचे भासवून घरच्यांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी साधून घरात चोरी करून पसार होणाऱ्या एका चोर मोलकरणीला टिळकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रत्ना शेखर झेंडे (41) असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. रत्ना झेंडे हिला कोणीही घरात मोलकरीण म्हणून कामावर घेऊ नये असे आवाहन पोलिसांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.




























































