सीआरपीएफच्या सहायक सब इन्स्पेक्टरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली सीआरपीएफच्या सहायक सब इन्स्पेक्टरला अटक केली. अटक झाल्यानंतर लगेचच केंद्रीय राखीव पोलिस दलाने त्याला बडतर्फ केले.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपी मोती राम जाट, जो सीआरपीएफमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक होता, तो 2023 पासून हेरगिरीच्या कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होता आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत (PIO) शेअर करत होता. एनआयएला असे आढळून आले की, आरोपी विविध मार्गांनी पीआयओकडून पैसे घेत होता. मोती रामला दिल्लीतून अटक करण्यात आली. पटियाला हाऊस कोर्टातील विशेष न्यायालयाने त्याला 6 जूनपर्यंत कोठडीत पाठवले आहे.