शिवसेना हे नाव कायम राहणारच, निलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली असली तरी भविष्यातही शिवसेना हे नाव कायम राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या उपनेत्या व विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी दिली आहे. निलम गोऱ्हे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

”शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल.शिवसेना नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल. चुकीची माहिती कुणीही देऊ नये. शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे सुचविले आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा आयोगाचा निर्णय तात्पुरता आहे.चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू राहील हे आयोगानं म्हटलं आहे.अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरेल.” असे ट्विट निलम गोऱ्हे यांनी केले आहे.