श्री वासुदेव स्वामींना साक्षात श्रीदत्तप्रभूंनी येऊनी दाखविले क्षेत्र काशी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“वासुदेव स्वामींना काशी विश्वेश्वराचे दर्शनासी इच्छा झाली ,
साक्षात श्रीदत्तप्रभूंनी येऊनी दाखिवले क्षेत्र काशी”

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री स्वामी महाराजांना काशीस जाण्याची खूप इच्छा होती. ते तेथील मंडळीचा निरोप घेऊन पायी काशीस जाण्यासाठी निघाले. सर्व मंडळीनी सांगून पाहिले की, येथून काशीस जाणे फार त्रासाचे आहे. वाटेत मोठे जंगल आहे. हिंस्त्र पशुचा त्रास आहे. तेव्हा आपण रेल्वेने जावे! “श्री स्वामी महाराज म्हणाले, श्री दत्तप्रभूंच्या कृपेने आतापर्यंत पायीच प्रवास केला आहे. तसाच त्यांच्या कृपेने पुढेही होईल!” आणि ते प्रवासाला निघाले. काही वाटचाल झाली इतक्यात एक भिल्ल श्री स्वामी महाराजांजवळ आला व म्हणाला “तुम्हांला काशीस जायचे आहे ना? मी वाट दाखवितो माझ्या मागून चला!”

त्याप्रमाणे श्री स्वामी महाराज त्यांच्या मागून चालू लागले पुढे टेकडी लागली, ती चढून गेल्यावर भिल्ल म्हणाला ”तो समोर गाव दिस ना, तेथून सरळ जा!” आणि तो भिल्ल दिसेनासा झाला. ज्या ठिकाण पोहोचण्यास दोन – तीन दिवस लागणार होते त्या काशीला दोन – तीन तासांत श्री स्वामी महाराज पोहोचले. ती रस्ता दाखविवणारा माणूस भिल्ल नसून प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूच होते!