निवृत्त कर्मचाऱ्याचे सरणावर बसून आमरण उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। निलंगा

पानचिंचोली ता. निलंगा जिल्हा लातूर येथील सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी शेख अब्बास नब्बीसाब यांनी 6 जानेवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर स्वतः चे सरण रचून आमरण उपोषण सुरू केले आहे.

नबिसाब हे ३१ ऑगस्ट २०१८ रोजी कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. पण त्यांना वेतन व राहणीमान भत्ता देण्यात आलेला नाही, असे त्यांनी गटविकास अधिकारी पं.स. निलंगा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच लाखो रुपये सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने हडप केल्याचा आरोपही नबिसाब यांनी केला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला.