
पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. कोर्टाने फरार घोषित केलेला नीरव मोदी हा दुसरा गुन्हेगार आहे. ईडीने नीरव मोदी विरोधात याचिका दाखल केली होती. जानेवारी महिन्यात कोर्टानेच विजय माल्याला अशाच प्रकारे फरार घोषित केले होते.
Mumbai: Nirav Modi has been declared a fugitive economic offender under Fugitive Economic Offenders Act by the special Prevention of Money Laundering Act ( PMLA) court today in Punjab National Bank scam case. Order on confiscation of his properties will happen later pic.twitter.com/Uk621OICpx
— ANI (@ANI) December 5, 2019
प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग कोर्टाने नीरव मोदीला फरार घोषित केले आहे. आता नीरव मोदीच्या सर्व संपत्तीवर जप्ती येणार आहे.पीएनबी च्या 13 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी लंडनच्या जेलमध्ये बंद आहे. हिंदुस्थानने ब्रिटन सरकारला त्याच्या प्रत्यार्पणाचा विनंती केली होती. तेव्हा लंडन पोलिसांनी 19 मार्च रोजी नीरव मोदीला अटक केली होती. गेली 9 महिने नीरव मोदी तुरुंगात आहे. नीरव मोदीने पाच वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. पाचही वेळा त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानी संस्था प्रयत्नशील आहेत.




























































