
निर्भयावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या चारही दोषींना फासाची चाहूल लागताच त्यांनी अन्नपाणी सोडले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाच्या तयारीमुळे चौघांच्या चेहऱ्यांवर भीती स्पष्ट दिसू लागली आहे. अक्षय, मुकेश, पवन आणि विनय या चारही कैद्यांना पूर्वीप्रमाणे भूक लागत नाही. ते कोठडीत येरझारा घालताना दिसत आहेत. गुरुवारपासून त्यांची दिवसातून दोन वेळा डॉक्टरकडून तपासणी होत आहे. मागील पाच दिवसांत कैद्यांचे वजन घटले आहे.
‘निर्भया’च्या दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण ही शिक्षा केव्हा होणार हे सरकारने जाहीर केले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला गळा आवळून ठार करण्यात आले. नंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आणि ‘निर्भया’च्या दोषींना लवकरात लककर फासावर लटकवण्याची मागणी झाली. त्यानंतर निर्भयाच्या दोषींना ज्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे तेथील हालचालींनाही वेग आला. हे लक्षात आल्यापासून अक्षय, मुकेश, विनय आणि पवन या ‘निर्भया’च्या दोषींची झोपेबरोबरच भूकही उडाली आहे. संपूर्ण रात्र ते तळमळतच काढत असून उपाशी पोटी झोपत आहेत.
अक्षयचे वजन 5 दिकसांत 55 करून 52 किलो, तर पवनचे 82 करून 81 किलो झाले आहे. मुकेशचे वजन मात्र 67 किलो कायम आहे. तिन्ही कैद्यांचा रक्तदाब सामान्य आहे. जेल-4 च्या कोठडीतील विनयची प्रकृती मात्र बिघडली आहे.
11 फास तिहारमध्ये…
‘निर्भया’च्या गुन्हेगारांना फाशीकर लटकवण्यासाठीचे 11 फास तिहार तुरुंगात पोहोचले आहेत. बक्सर येथून फाशीचे दोरखंड मागवण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी फाशीगृहात कैद्यांच्या वजनानुसार पोत्यात वाळू भरून फाशीची तयारी करण्यात आली. तिहार तुरुंगाच्या करिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मीरत जेलचे जल्लाद पवन यांनी फाशी देण्याची तयारी केली आहे. आता डेथ कॉरंट जारी झाल्यानंतर मीरत येथून जल्लादाला बोलावले जाईल.
उत्तर प्रदेशातून बोलावले दोन जल्लाद
उत्तर प्रदेशातून तिहार जेलमध्ये दोन जल्लादांना बोलावण्यात आले आहे. तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशच्या जेल विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून जल्लाद पवन यांना दिल्लीला पाठवण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशात केवळ दोन जल्लाद आहेत. उत्तर प्रदेश कारगृहाचे महासंचालक आनंद कुमार यांनी तिहारमधून पत्र मिळाल्याचे सांगितले आहे. तिहार जेलच्या प्रशासनाला आम्ही उत्तर दिले असून आवश्यक त्या दिवशी जल्लाद पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
























































