
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता चांगलीच नियंत्रणात आली असून झोपडपट्टीने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. पालिकेच्या 24 वॉर्डपैकी 18 वॉर्डमध्ये आता एकही पंटेनमेंट झोन नाही. तर एका प्रभागात एक, दोन प्रभागात 2, एका प्रभागात 3 अशा सहा प्रभागांत फक्त 22 प्रतिबंधित क्षेत्रे शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्वाधिक धोका असलेल्या दाटीवाटीच्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीसह कुर्ला, वरळी कोळीवाडे, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी, वांद्रय़ाच्या झोपडपट्टीसह संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टी भागात वेगाने रुग्णसंख्या वाढल्याने ‘कोरोना हॉटस्पॉट’ निर्माण झाल्याने निकट संपर्क टाळून कोरोना कसा रोखणार असे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले होते. मात्र या भागात पालिकेने ‘मिशन झिरो’सह ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, सॅनिटायझर, जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावी काम केल्यामुळे झोपडपट्टीतील कोरोना वेगाने नियंत्रणात आला. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत पुन्हा एकदा दाटीवाटीच्या झोपडपट्टय़ांना धोका निर्माण झाला होता. मात्र दुसऱया लाटेतही इमारती आणि उच्चभ्रू वस्तींच्या तुलनेत झोपडपट्टीने कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवले आहे.
फक्त ‘हे’ विभाग बाकी
संपूर्ण झोपडपट्टीने कोरोनाकडे वाटचाल केली असून फक्त सहा वॉर्डमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके कंटेनमेंट झोन शिल्लक आहेत. यामध्ये के/पूर्व अंधेरी पूर्वमध्ये 8 पंटेनमेंट झोन, आर/दक्षिण कांदिवली 6, एस भांडूप 3, टी मुलुंड आणि एम/पश्चिम चेंबूरमध्येमध्ये प्रत्येकी 2 आणि ई भायखळा प्रभागातील झोपडपट्टय़ांमध्ये केवळ एक कंटेनमेंट झोन शिल्लक आहे.
दाटीवाटीच्या भागात कोरोना आटोक्यात
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये पालिकेसाङ्गी आव्हान ङ्खरलेल्या उत्तर मुंबईतील आर/मध्य बोरिवली, आर/उत्तर दहिसर, पी/दक्षिण गोरेगाव, पी/उत्तर मालाड, के/पश्चिम अंधेरी पश्चिम विभागातील झोपडपट्टय़ांमध्ये आता एकही कंटेनमेंट झोन नाही.
याशिवाय ए वॉर्ड पर्ह्ट, बी डोंगरी, सी चिराबाजार, काळबादेवी, डी ग्रँटरोड, एफ उत्तर शीव-वडाळा, पिंग सर्कल, एफ दक्षिण परळ, एल्फिन्स्टन, जी/उत्तर धारावी, दादर, माहीम, एच पूर्व वांद्रे पूर्व, एच/पश्चिम वांद्रे पश्चिम, एल कुर्ला, एन घाटकोपर या वॉर्डमधील झोपडपट्टय़ांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही.
धारावीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह दिवसभरात एकही रुग्ण नाही
कोरोनाच्या दुसऱया लाटेला रोखण्यासाङ्गी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका आक्रमकपणे राबवत असलेले मुंबई मॉडेल त्याचबरोबर कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर दिल्यामुळे आशियातील सर्वात मोङ्गी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कोरोना रिपोर्ट आज निगेटिव्ह आला. धारावीत आज दिवसभरात एकही नवा रुग्ण सापडला नसून सक्रीय रुग्णांची संख्याही 1 हजारावरून 13 वर पोहोचली आहे, तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 880 दिवसांवर पोहोचला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वीपणे रोखल्यानंतर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने दुसरी लाट नियंत्रणात आणली असून मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या आङ्गशेच्या आत आहे. त्याच जोडीला अत्यंत दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावी झोपडपट्टीतील कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस उतरणीला लागली आहे.
केवळ 13 सक्रिय रुग्ण
अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या धारावीची लोकसंख्या जवळपास 8 लाखांपर्यंत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेने धारावीसाङ्गी धारावी मॉडेल राबवून कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आणली. धारावी मॉडेलनुसार ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या 4 टी वर भर देण्यात आला आणि हेच मॉडेल दुसर्या लाटेतही कायम आहे. त्यात जनजागृतीबरोबर कोरेंटाईनचे नवे कठोर नियम आणि कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळेच 8 लाखांच्या अत्यंत दाटीवाटीच्या लोकसंख्येमध्ये एकही रुग्ण न सापडणे, ही पालिकेची दुसर्या लाटेतील सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. त्याचबरोबर सक्रीय रुग्णांची संख्याही कमी राखण्यात पालिकेला यश आले आहे. धारावीत सापडलेल्या 13 सक्रीय रुग्णांपैकी 6 रुग्ण हे घरीच कोरेंटाईन आहेत, 4 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 3 रुग्ण हे लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले असून ते कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
धारावीबरोबरच दादरमध्येही रुग्णसंख्या कमालीची घसरली असून आज दिवसभरात 3 तर माहीममध्ये दिवसभरात 6 रुग्ण सापडले.






























































