
लग्न म्हटलं की नवऱयाची वरात नवरीच्या घरी अगदी थाटामाटात घेऊन जाण्यात येते. पण, नुकताच सोशल मीडियावर एका वरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वरातीत ना डीजे आहे ना बँडबाजा… या अनोख्या वरातीतील प्रत्येकाने कानावर हेडपह्न लावला असून या हेडफोनमधून गाणी ऐकत वरातीत नाचताना दिसून येत आहेत. अशी अनोखी वरात आजवर कधीच पाहिली नसेल.




























































