
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा आरक्षण विधेयक आज एकमाताने मंजूर करण्यात आल्यानंतर विधानपरिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची चिन्ह दिसत नाही, असं सूचक विधान केलं.
विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झाले असले तरी संसदेकडे पाठवले जाईल. संसदेत पाठावल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्यास पुन्हा हे विधेयक अडकेल, अशी शंका विरोधपक्षांकडून उपस्थित करण्यात आली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच यावर निर्णय घेतला जाईल. तसेच लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची चिन्ह दिसत नाही, असं ते म्हणाले.


























































