कुडाळात दुसऱ्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल

कुडाळ तालुक्यात होणाऱ्या 54 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी 5, तर सदस्यपदासाठी 11 असे एकूण 16 उमेदवारी अर्ज येथील तहसीलदार कार्यालयात दाखल आले आहेत.

तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींची 18 डिसेंबरला निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नव्हता. मंगळवारी दुसऱ्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात 5 सरपंच आणि 11 सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. यात सरपंच पदासाठी निवजे, रानबांबुळी, चेंदवण, निरूखे व घोटगे अशा पाच अर्जांचा समावेश आहे, तर सदस्य पदासाठी आंबडपाल, सरंबळ, निवजे, निरूखे, पिंगुळी, साळगाव, तुळसुली तर्फ माणगांव, केरवडे तर्फ माणगांव या ग्रा.पं.मधून 11 अर्ज दाखल करण्यात आले. येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.