
एक्स आणि इन्स्टाग्रामवर नासाने एक फोटो शेअर केला आहे. पॅन या उपग्रहाचे टिपलेले हे छायाचित्र असल्याची माहिती नासाने दिली आहे. शनीभोवतीच्या कड्य़ांपैकी एका कड्य़ाच्या आतील जागेतून हा पॅन उपग्रह शनीभोवती प्रदक्षिणा घालत असतो.
व्हॉयेजर-2 यानाने पाठवलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करून 1990मध्ये शोवॉल्टर या खगोल निरीक्षकाने सर्वप्रथम पॅनचा शोध लावला होता.






























































