
कोरोनाच्या नव्या ‘एक्सई’ या व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे ढग दाटलेले असताना NTAGI चे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोनाच्या ‘एक्सई’ या नव्या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही, असे व्हेरिएंट येत राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटला विकसीत करण्यास हातभार लावत असून यात ‘एक्स’ सीरिजच्या व्हेरिएंटचाही समावेश आहे. हा व्हेरिएंट यूकेमधून आला असून त्यामुळे गंभीर संकट उद्भवेल अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिएंट अनेक नवीन रुपांना जन्म देत आहे. जसे की ‘एक्स’ सीरिज आणि यातीलच एक भाग म्हणजे ‘एक्सई’ हा व्हेरिएंट, असे डॉ. एन. के. अरोरा म्हणाले. कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट येत राहतील, पण घाबरण्याची आवश्यकता नाही. सध्या जी काही आकडेवारी मिळतेय त्यावरून तो हिंदुस्थानमध्ये वेगाने पसरताना दिसत नाहीय, असेही ते म्हणाले.
गुजरातमध्ये एक रुग्ण 13 मार्चला आढळला होता. मात्र, आठवड्याभरानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्याच्या सँपलच्या तपासणीत त्याला XE व्हेरिएंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा व्हेरिएंट BA.2 पेक्षा 10 टक्के जास्त संक्रामक असल्याचे सांगण्यात येत आहे. BA.1 आणि BA.2 स्ट्रेनमधून हा व्हेरिएंट निघाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही म्हटले आहे.
Omicron giving rise to many new variants. It is of X series like XE & others. These variants will keep on occurring. Nothing to panic about… At the moment from Indian data it doesn’t show a very rapid spread: NK Arora, Chairman, Covid working group NTAGI pic.twitter.com/fu5E3QmdoJ
— ANI (@ANI) April 11, 2022
‘एक्सई’ व्हेरिएंटचे ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण
- ‘एक्सई’ हा ओमायक्रॉनचे सबव्हेरिएंट बीए-1 आणि बीए-2 याचा रिकॉम्बिनेंट स्ट्रेन आहे. बीए-2च्या तुलनेत दहापट वेगाने जास्त फैलावतो.
- ब्रिटनमध्ये 19 जानेवारीला ‘एक्सई’ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला होता. सध्या ब्रिटनमध्ये 600 वर रुग्ण आहेत. त्यानंतर थायलंड, न्यूझीलंडमध्येही या व्हेरिएंटने शिरकाव केला.
- जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला ‘एक्सई’ हे नाव दिले आहे. अनेक देशांनी या नवीन व्हेरिएंटपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे.
रुग्णसंख्या नियंत्रणात
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णसंख्या पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 861 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 929 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 11 हजार 58 कोरोना रुग्ण सक्रिय असून एकूण मृतांचा आकडा 5 लाख 21 हजार 691 वर पोहोचली आहे.
India reports 861 fresh #COVID19 cases, 929 recoveries, and 6 deaths in the last 24 hours.
Active cases: 11,058 (0.03%)
Death toll: 5,21,691
Total recoveries: 4,25,03,3831,85,74,18,827 crore vaccine doses have been administered so far. pic.twitter.com/k63exSU7V9
— ANI (@ANI) April 11, 2022

























































