
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असताना राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विद्यापीठाने दादर रेल्वे स्थानक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमात रामनिरंजन आनंदीलाल पोदार महाविद्यालय, एम.डी. महाविद्यालय, सायन येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालय आणि लाला लजपतराय महाविद्यालय येथील एनएसएस स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. केईएम ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 61 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.





























































