नानावटी अंतिम फेरीत

अष्टपैलू फरहान काझी, ओंकार जाधव, प्रतीक पाताडे, विजय बागडे यांच्या अप्रतिम खेळामुळे नानावटी हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलचा 8 विकेटने पराभव केला आणि आयडियल स्पोर्टस् अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्टस् मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. फरहान काझीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

नवरोज-आझाद मैदानावर सलामीवीर सचिंद्र ठाकूर (43 चेंडूंत 27 धावा) व चेतन सुर्वे (20 चेंडूंत 15 धावा) यांनी रहेजा हॉस्पिटलला 1 बाद 48 धावा अशी उत्तम सुरुवात करून देऊनही नानावटी हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांचा डाव 19.1 षटकांत 76 धावांत गुंडाळला. फरहान काझी (5 धावांत 3 बळी), प्रतीक पाताडे (9 धावांत 2 बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.