प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही, दिल्ली दरबारी अपमानाची परंपरा सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

दिल्लीतील महाशक्ती आमच्या पाठीशी आहे, अशा वल्गना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच करत असले तरी प्रत्यक्षात दिल्ली दरबारात महाराष्ट्राच्या अपमानाची मालिका अजूनही जोरात सुरूच आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाची भाजप नेत्यांनी मालिका सुरू केलेली असताना दिल्लीत प्रजासत्ताकदिनी आयोजित चित्ररथासाठी महाराष्ट्राला साधे निमंत्रणही पाठवले गेले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱया चित्ररथाच्या संचलनामुळे त्या त्या राज्यातील संस्कृतीचे विहंगम दर्शन देशाला आणि जगाला होत असते, मात्र महाराष्ट्रातल्या नाकर्त्या खोके सरकारमुळे व दिल्लीतील महाराष्ट्रद्वेष्टय़ा सरकारमुळे यंदा चित्ररथासाठी महाराष्ट्राला साधे निमंत्रणही पाठविले गेले नसल्याचे पेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.

‘साडेतीन शक्तिपीठ’ ही यंदाची महाराष्ट्राची चित्ररथाची संकल्पना आहे, मात्र तिला मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. चित्ररथाच्या अंतिम यादीसाठी 14 राज्यांना केंद्र सरकारतर्फे निमंत्रण पाठविण्यात आले, त्यात दुर्दैवाने महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे समजते.

दरवर्षी चित्ररथासाठी निवडक राज्यांना संधी दिली जाते. संचलनावेळी असलेला निर्धारित वेळ लक्षात घेऊन ही व्यवस्था केलेली असते. त्यासाठी रोटेशन पद्धती वापरली जाते, अशी लंगडी सबब अधिकारी वर्गाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात यामुळे खोके सरकारला दिल्ली दरबारी किती किंमत आहे हे दिसून आले आहे. यापूर्वीही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अगदी शेवटच्या रांगेत उभे करण्यात आले होते. त्यामुळे महाशक्तीच्या नावाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जपमाळ ओढत असले तरी तथाकथित महाशक्ती महाराष्ट्राच्या अपमानाची एकही संधी सोडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीचा कार्यक्रम ओके

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना महाराष्ट्रातील संतपरंपरा व जैवविविधता या संकल्पनेवर आधारित चित्ररथाचे दिमाखात संचलन झाले होते. त्याचे काwतुकही देशपातळीवर झाले होते, मात्र पह्डापह्डी करून सत्तेचे जुगाड केलेल्या मिंधे सरकारने चित्ररथाच्या निमित्ताने महाराष्ट्राचीही प्रतिमा धुळीला मिळवली आहे.