
सामना प्रतिनिधी । उल्हासनगर
रोकड भरण्यासाठी डोंबिवली एमआयडीसीतील बँकेत जाणाऱया एका व्यावसायिकाला वाटेत लुटल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली आहे. यापैकी अजगर अली हसन मोमीन ऊर्फ अजगर हा दरोडेखोर टीम ओमी कलानीचा सदस्य असल्याचे उघड झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगरात राहणारे दिलीप कुकरेजा हे त्यांच्या दुकानाची रोख रक्कम भरण्यासाठी डोंबिकली एमआयडीसी येथे जात असताना दबा धरून बसलेल्या हरीश गोस्वामी, अली अजगर, गणेश सोनवणे, पायल शेख, तालीम अन्सारी, राहुल परिहार, विकी मुदलियार, हरेश सिंह, सलीम शेख यांनी कुकरेजा यांच्याकडील रोख रक्कम लुटली. कुकरेजा यांच्या तक्रारीकरून डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अली अजगर याच्यासह चार जणांना अटक केली असून अन्य फरारी दरोडेखोरांचा ते कसून शोध घेत आहेत.






























































