अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतमजरावर अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणार्‍या वझर गाव शिवारात सोमवारी घडली. मनोहर वाकोडे असे मृताचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांचे नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सोमवारी खामगाव तालुक्यातील वझर गाव शिवारामध्ये गवत कापण्यासाठी मनोहर बबन वाकोडे या 48 वर्षीय शेतमजूरावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वाकोडे हे गंभीररित्या जखमी झाले. जखमी अवस्थेतच दोन तास शिवारातच पडून राहिल्याने त्यांचा अति रक्तस्राव झाला. दोन दिवसानंतर त्यांचा शोध लागला. यानंतर त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.