ऑनलाईन जेवण ऑर्डर करताय? असे मिळावा डिस्काउंट आणि कॅशबॅक

सध्या ऑनलाईन जेवण मागवणे ही खूप सामान्य बाब आहे. बर्‍याच वेळेला ऑनलाईन जेवण मागवणे महाग पडतं कारण त्यावरील टॅक्स आणि डिलिव्हरी चार्जेसमुळे ऑर्डरची किंमत वाढते.

online-food-3

असे असले तरी ऑनलाईन जेवण मागवताना काही कुपन्स आणि काही ट्रिक्स वापरल्यास आपल्याला डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळतात, त्यामुळे ऑर्डर स्वस्तात मिळते.

online-food-2

सध्या आपल्याकडे स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्या फूड डिलिव्हरीमध्ये आघाडीवर आहेत. त्यापैकी स्विगीमध्ये सुपर नावाची सुविधा आहे. त्यामध्ये महिन्याचे शुल्क भरून तुम्हाला ऑर्डर फ्री डिलिव्हरी मिळेल.

online-food-9

झोमॅटोमध्ये असा पर्याय नाही. झोमॅटोमधील प्रीमियम मेंबरशीमुळे हॉटेलमध्ये गेल्यास एकूण बिलावर डिस्काऊंट मिळतं.

online-food-8

स्विगी किंवा झोमॅटेवर ऑर्डर देताना पेमेंट करताना ऍपमध्येच कुपन्स चेक करा. कुपन्समध्ये बर्‍याच वेळेला डिस्काऊंट कोड टाकून फ्री डिलिव्हरी किंवा एकूण ऑर्डरवर मोठे डिस्काऊंट मिळतं. तसेच काही कुपन्सवर एका ऑर्डवर दुसरी ऑर्डरही फ्री मिळते.

online-food-7

पेमेंट करताना त्यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच अनेक ऑनलाईन पेमेंटचे पर्याय असतात. विशिष्ट पेमेंट ऍप वापरल्यास तुम्हाला डिस्काऊंट किंवा कॅशबॅक मिळू शकतो.

online-food-6

ऍमेझॉनची ऍमेझॉन पे नावाची सुविधा आहे. ऍमेझॉन पे मध्ये पैसे भरू जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा बर्‍यावे वेळा कॅशबॅक मिळतो. हा कॅशबॅक तुमच्या ऍमेझॉन खात्यात जमा होतो आणि हा कॅशबॅक तुम्हाला नंतर कुठेही वापरता येतो.

online-food-5

बर्‍याच वेळेला आपण गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम सारख्या ऍपमधून पेमेंट करतो. तेव्हा हे ऍप्स आपल्याला कुपन्स देतातं. त्यात स्विगी, झोमॅटो किंवा इतर फ़ूड डिलिव्हरीचे कुपन्स असतात. हे कुपन्स वापरल्यासही तुम्हाला डिस्काऊंट किंवा कॅशबॅक मिळू शकतो.

online-food-4

स्विगी किंवा झोमॅटोचे प्रिमियम मेंबरशीप तुम्ही शेअरही करु शकता. म्हणजेच एक ऍप तुम्ही तीन चार मित्र मिळून वापरल्यास मेंबरशीपचा पूर्ण फायदा तुम्हाला घेता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या