नाशिकमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिह्यात लसींचे 51 हजार डोस उपलब्ध असून हा साठा दोन दिवस पुरेल इतकाच आहे. जिह्यात आज दीडशे केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

नाशिक, मालेगाव महापालिका आणि जिह्याच्या ग्रामीण भागात एपूण 250 लसीकरण पेंद्रे आहेत. त्यापैकी दीडशे पेंद्रांवर आज लसीकरण सुरू होते. काल जिह्यासाठी 23 हजार डोस प्राप्त झाले, त्यामुळे उपलब्ध साठा 51 हजार इतका आहे. दर आठवडय़ाला एक लाख डोसची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिली.

कठोर निर्बंधांमुळे नाशिकमध्ये शुकशुकाट; पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध आणखी कठोर केले आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजेपासून नाशिक शहर व जिह्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱया नागरिकांची तपासणी करीत कारवाई केली. यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.

नाशिक शहरासह जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून, झपाटय़ाने वाढणारा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. राज्य सरकारने गुरुवारी रात्री आठ वाजेपासून 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यात शहरांतर्गत व जिह्यांतर्गत प्रवासावर निर्बंध असून, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवासाला बंदी आहे, त्याच्या कडक अंमलबजावणीसाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱया नागरिकांची तपासणी करीत कारवाईचा बडगा उगारला. शहरात आज बससेवा तुरळक सुरू होती, तसेच रिक्षांचीही वर्दळ कमी झाली होती. सर्वत्र विशेषतः बाजारपेठांमध्ये आणि प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता.