मुक्त विद्यापीठाची बी.टेक. पदवी पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची बी.टेक. पदवी पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाईल, असा निर्णय ‘कॅट’ने दिला आहे.

संजय खाडे व त्यांच्या दोन सहकाऱयांनी मुक्त विद्यापीठातून बी.टेक. ही पदवी प्राप्त केली. ते आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ) केंद्रात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आहेत. ज्युनियर टाईम स्केलमधील असिस्टंट डायरेक्टर ऑफ इंजिनीअरिंग या पदावरील बढतीसाठी मुक्त विद्यापीठाची त्यांची ही पदवी ग्राह्य नसल्याचे कारण देत त्यांना बढती नाकारण्यात आली होती. त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट)कडे दाद मागितली. कॅटचे न्यायिक सदस्य हरविंदर कौर ओबेरॉय आणि प्रशासकीय सदस्य श्री कृष्ण यांच्या खंडपीठाने त्यांच्या दाव्यावर निकाल दिला.