आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये जिओ 5G चे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मागील दोन वर्षे ऑनलाइन पार पडलेला आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट यंदा विद्यार्थ्यांच्या सहभागासह 16 ते 18 डिसेंबरदरम्यान आयआयटी मुंबईच्या पवई पॅम्पसमध्ये होणार आहे. यंदाच्या टेकफेस्टच्या माध्यमातून देशात जिओ नेटवर्कच्या सहकार्याने 5G नेटवर्कचे लाँचिंग करण्यात येणार असून आयआयटीच्या द्वारे 5उ सेवा कार्यरत असणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. या माध्यमातून 5G सेवा देणारे मुंबई हे जगातील 11 वे शहर ठरणार आहे.

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टचे यंदाचे 26 वे वर्ष असून ड्रोन लाईट शो, जिओ 5G नेटवर्क, टेकफेस्ट ड्रोन रेसिंग, ईडीएम नाईट, विविध सादरीकरणे आणि प्रदर्शने ही यंदाच्या टेकफेस्टची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. इंटरनॅशनल रोबोट वॉर, इंटरनॅशनल फुल थ्रॉटल आणि बोइंग एरोमॉडेलिंग चॅलेंज यांसारख्या उपक्रमांसह टेकफेस्टमध्ये जगभरातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. टेकफेस्टचा भाग म्हणून टेककनेक्ट हे प्रदर्शन फिजिक्स पार्पिंग लॉटमध्ये 16 डिसेंबरला सकाळी 11.30 वाजता होणार असून इस्रोचे संचालक शास्त्र्ाज्ञ डॉ. व्ही. नारायणन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ‘भारतीय अंतराळ कार्यक्रम – एक विहंगावलोकन’ या विषयावर येथील पी. सी. सक्सेना सभागृहात त्यांचे व्याख्यान होणार आहे.

ड्रोन रेसिंग लीग

टेकफेस्टच्या इतिहासात यंदा प्रथमच टेकफेस्ट ड्रोन रेसिंग लीग आयोजित करण्यात येणार आहे. नाईट ड्रोन रेसिंगमध्ये अनेक इव्हेंट्स, हवेत ड्रोन उडविणे असा स्पर्धा होणार असून जिमखान्यात ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.