तोंडी आणि मूल्यमापन परीक्षांचे स्वातंत्र्य शाळा आणि कॉलेजांना, राज्य शिक्षण मंडळाकडून नियमावली जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षा ऑफलाइनरीत्या होणार असल्याचे बोर्डाने जाहीर केल्यानंतर आता या परीक्षांसाठी विशेष नियमावली रविवारी जाहीर केली. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी तोंडी परीक्षा, मूल्यमापन परीक्षा आणि श्रेणी परीक्षांचे स्वातंत्र्य शाळा आणि कॉलेजांना देण्यात आले आहे. बोर्डाने जाहीर केलेली ही नियमावली सर्व शाळा, कॉलेजांना बंधनकारक करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 21 मे ते 10 एप्रिल तर बारावीच्या 22 मे ते  10 एप्रिलदरम्यन आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावीच्या तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे तर बारावीच्या कला, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी, तोंडी, व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित महाविद्यालयांना देण्यात आले आहे. तर बारावीचे विद्यार्थी भविष्यात विविध कौशल्याधारित उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणार असल्याने व सध्या कोविड 19ची परिस्थिती लक्षात घेता प्रात्यक्षिकांची संख्या मंडळाकडून कमी करण्यात आली आहे.

दहावीच्या दिव्यांग विद्यार्थांसाठी कार्यशिक्षण / शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र  विषयांच्या लेखीप्रत्यक्षिक परीक्षा ही 21 मे ते 1 एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या पाण्याच्या बाटल्या, सॅनिटायझर, आणि लेखन साहित्य नेण्याची पवारगनी देण्यात आली आहे. त्याबरोबरच स्वतःचा मास्क अनिवार्य असणार आहे.