नीता अंबानीच्या वाढदिवसानिमित्त तीन हजार गरजू मुलांना दिले सुग्रास भोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंबानी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा व मुकेश अंबाी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील 3000 गरजू मुलांना सुग्रास भोजनाची सोय करण्यात आली होती. यावेळी स्वत: नीता अंबांनी यांनी मुलांना जेवण वाढले. या कार्यक्रमात मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आला होता व त्यांनाभेटवस्तू देखील देण्यात आल्या.

नीता अंबानी यांनी 1 नोव्हेंबरला त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त देशभरातील 1.4 लाख लोकांना अन्नधान्य वाटण्यात आले.