
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता बंद करण्याचा निर्णय कर्मचारी विभागाने घेतला आहे. हा भत्ता केंद्राच्या अखत्यारीमधील औद्योगिक क्षेत्र, ऑपरेशनल स्टाफला मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाच्या, तातडीच्या कामासाठी उशिरापर्यंत थांबण्याच्या लेखी सूचना ज्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम भत्ता मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.




























































