
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रसिद्ध उद्योजक अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ तर डॉ. अशोक कुकडे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा यात समावेश
कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांना, सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सय्यद शब्बीर यांना, प्रसिद्ध अभिनेते दिनयार काँट्रक्टर यांनी कला व नाटय़ क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी आणि सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रा. सुदाम काटे यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.






















































