विधान परिषद पोटनिवडणूक; डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी महाराष्ट्रात पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली.

कॉँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे आकस्मिक निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरच त्यांची पत्नी प्रज्ञा यांना संधी दिली जाईल अशी अटकळ होती; मात्र त्या जागी कॉँग्रेसने अनपेक्षितपणे रजनी पाटील यांना संधी दिल्याने काँगेसमधील ओबीसी व विशेषतः माळी समाजात नाराजी होती. त्याची दखल घेत काँगेस नेतृत्वाने प्रज्ञा सातव यांना प्रदेश काँगेसच्या उपाध्यक्षपदाची संधी दिली होती, मात्र राजीव सातव यांचे हायकमांडशी निकटचे संबंध असतानाही त्यांच्या कुटंबाला न्याय मिळत नसल्याची भावना समर्थकांमध्ये असल्याने त्याची दखल घेत काँगेस नेतृत्वाने डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.