पुणेरी पगडी नको म्हणून शरद पवारांची कार्यक्रमला दांडी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आज एका कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात दाखल झाले आहेत. या विशेष कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. मात्र शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारली आहे. असं करण्यामागे ‘पगडी’चं राजकारण असल्याची चर्चा आहे.

अग्रलेख: एक‘पगडी’ राजकारण

या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींसह शरद पवारांचाही पुणेरी पगडी परिधान करून सत्कार करण्याची कार्यक्रमाची रूपरेषा होती. हे लक्षात आल्यानंतरच शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कार्यक्रमास हजर न राहण्याचा निर्णय घेतल्याची कुजबुज आहे.

पवार साहेब, तुम्हाला कोणती पगडी घालायची हे जनतेलाही माहीत आहे

दरम्यान, शरद पवार हे सध्या पगडीच्या राजकारणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. रविवारी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आवर्जुन छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला आणि यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात फुले पगडी घालण्याचा सल्ला दिल्याने पगडी पुराण चांगलेच गाजले आहे.