
कधी कधी गडबडीत किंवा त्रास होत असलल तर चुकीची औषधं घेतली जाऊ शकतात. एका महिलेच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे. फक्त यावेळी तिने घेतलेली गोळी ही औषधाची नसून काहीतरी भलतंच घेतलं होतं.
अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स येथे ही महिला राहते. तिचं नाव कार्ली बेलर असं आहे. कार्ली हिने सोशल मीडियावर हा अनुभव शेअर केला आहे. ही घटना 5 नोव्हेंबरची आहे. ती तिच्या एका मित्राकडे गेली होती. तिचं अंग दुखत असल्याने तिने इबुप्रोफेन नावाचं पेनकिलर घ्यायचं ठरवलं.
अंगात त्राण नसल्याने ती तशीच पलंगावर पडून होती. तिच्या एका हातात इअरपॉड होते, तर दुसऱ्या हातात गोळी. तिने पाण्याची बाटली उचलली आणि गोळी समजून इअरपॉड तोंडात टाकला आणि पाणी पिऊन टाकलं.
दुसऱ्या दिवशी ती तिचे इअरपॉड्स शोधत होती, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, तिचं एक इअरपॉड गायब आहे. तिने लोकेशन सर्च करायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या पोटातून आवाज येऊ लागला.
दोन दिवसांनंतर कार्लीने पुन्हा लोकेशन शोधलं तर ते पॉड बंद असल्याचं तिला कळलं. तिने घाबरून रुग्णालय गाठलं आणि एक्स रे करवला. सुदैवाने तिच्या अंतर्गत अवयवांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. तो इअरपॉड मात्र नैसर्गिक पद्धतीने तिच्या शरीरातून निघून गेला होता.



























































