चंद्रकांत पाटलांसमोर पक्षाची कोअर कमिटी सोडल्याची पंकजा मुंडेंची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिनाभर सुरू असलेल्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी आज अखेर पूर्णविराम दिला. गोपीनाथ गडावर घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. ‘स्वातंत्र्यासाठी बंडखोरी करावी लागते, मी बंडखोर आहे. आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. मी शांत तर बसणारच नाही घरातही बसणार नाही. मला माझा तो जुना पक्ष परत पाहिजे असे म्हणत मी कोअर कमिटीतून मुक्त होत आहे’, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.

चंद्रकांत दादा, मी भाजपचा नाही, माझ्याच पक्षाचा! जानकरांनी स्टेजवरून सुनावलं

परळी मतदार संघात झालेल्या दारुण पराभवानंतर तब्बल महिन्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना मेळाव्यात व्यक्त केल्या.त्या म्हणाल्या की, ‘मी कुठेही जाऊन काहीही करू शकते पण तसे मी करणार नाही. लोकनेते गोपीनाथ मुंडेंना निधनानंतरही लोक आदराने बोलतात. त्या मर्दाची मी मुलगी आहे. पराभवाने खचणारी पंकजा मुंडे नाही. माझी जनतेशी जोडलेली नाळ कोणी तोडणार नाही. 12 दिवस संजय राऊत यांच्यानंतर मीच टीव्हीवर असल्याची किमया मुंडेंची असल्याचेही त्यांनी नमूद केले. माझा आवाज दाबू नका, असे आवाहन त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोरच केले.

Video – गोपीनाथ गडावरून एकनाथ खडसेंची भाजपला टोलेबाजी